सिद्दरामय्यांसह काँग्रेस नेत्यांना पराभवाची भीती जाणवतेय. त्याचमुळे ते आमच्यावर वैयक्तिक टीका करत आहेत असा टोला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हाणला.
म्हैसूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना बोम्मई म्हणाले, सिद्दरामय्या किंवा हरिप्रसाद या काँग्रेस नेत्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यास प्रारंभ केला आहे. त्यावर प्रतिक्रिया न देण्याचे मी ठरवले आहे. ही कर्नाटकाची किंवा कर्नाटकाच्या राजकारणाची संस्कृती नाहीय. लोकशाहीत सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर टीका करता. त्यांच्या सत्ताकाळात आमही त्यांचे घोटाळे, गैरव्यवहार यावर टीका केली. तशीच ती त्यांनीही करावी. पण वैयक्तिक टीका करणे हे राजकीय संकेताला धरून नाही. मोफत वीज देण्याचे आश्वासन त्यांनी दिली. पण त्यांच्या काळात वीज पुरवठा कंपन्या डबघाईस आल्या होत्या. आम्ही सत्तेवर आल्यावर या कंपन्यांना ८ हजार कोटींचा थेट निधी आणि १३ हजार कोटींची कर्जहमी दिल्याने त्या तग धरून आहेत. त्यामुळे मोफत वीज देण्याचे आश्वासन पाळता येणार नाही याची खात्री काँग्रेसवाल्याना आहे. एससी-एसटीना आम्ही ७५ युनिट वीज मोफत देतोय. त्याचे अनुकरण करून कसलाही ताळमेळ न घालता काँग्रेसवाले २०० युनिट मोफत विजेची घोषणा करून बसलेत अशी टीका बोम्मई यांनी केली.
बिबट्याच्या हल्ल्यात १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. याची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. अशा घटनेत दिल्या जाणाऱ्या भरपाई रकमेत वाढ आणि करून ती त्वरित देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असे बोम्मई यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. काँग्रेस नेत्यांकडून मोदींवर केल्या जाणाऱ्या टीकेसंदर्भात प्रतिक्रिया देताना बोम्मई म्हणाले, खुद्द गुजरातमध्ये मोदींवर भरपूर टीका केली. पण जितकी टीका जास्त झाली तितक्या अधिक जागा भाजपच्या निवडून आल्या. मोदींचे सुशासन संपूर्ण १३० कोटी लोकांना माहित आहे. त्यामुळे काँग्रेसच्या टीकेकडे लक्ष देण्याची गरज नाही असे बोम्मई यांनी सांगितले. बाईट एकंदर, पराभवाच्या भीतीनेच काँग्रेसने वैयक्तिक टीका करणे सुरु केली असे बोम्मई यांनी सांगितले.


Recent Comments