राज्यातील वस्त्रोद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी यासाठी बेंगळूर येथे केंद्र उभारणीसाठी जागेची पाहणी करून यासंदर्भात मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली.
कर्नाटक राज्य तोगटवीर क्षत्रिय नेकार संघातर्फे बेंगळूरच्या सेंट्रल कोलेलच्या सभागृहात आयोजित संघाच्या अमृत महोत्सवाचे उदघाटन करून ते बोलत होते.
मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, जागतिकीकरणानंतर अनेक पारंपरिक व्यवसायांवर परिणाम झाला आहे. त्यात वस्रोद्योगही एक आहे. पारंपरिक कौशल्ये जपण्यासह आधुनिकतेची कासही धरली पाहिजे. वस्त्रोद्योगाला बाजारपेठ मिळाली तरच उत्पादनांची विक्री आणि पर्यायाने विणकरांची भले होणार आहे. आमच्या सरकारने विणकरांची सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. हातमाग विणकरांना मदत रकमेत दोन हजारांवरून पाच हजार रुपये वाढ केली आहे. त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा वीजमाग विणकरांना आणि केवळ मालकच नव्हे तर कामगार विणकरांनाही उपलब्ध केल्या आहेत. शून्य टक्के व्याजदराने दोन लाखांपर्यंतचे कर्ज देण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले.

वस्त्रोद्योग हा सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणारा उद्योग आहे. राज्यातील वस्त्रोद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी यासाठी बेंगळूर येथे केंद्र उभारणीसाठी जागेची पाहणी करून यासंदर्भात मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यानी दिले.

यावेळी मंत्री के. सी. नारायनगौडा, खासदार पी. सी. मोहन, संघाचे अध्यक्ष व्ही. एस. सोमशेखर, दिव्यानंदगिरी स्वामीजी, पूर्णानंद पुरी स्वामीजी, एम. डी. लक्ष्मीनारायण आदी उपस्थित होते.


Recent Comments