माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी ग्रामीण मतदारसंघात भाजपला मतदान करण्यासाठी कुणाला तरी माणशी सहा हजार रुपयांची भेट देणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात कायदा आणि निवडणूक आयोग असेल, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पाहत असतील तर काय कारवाई करायची, हे त्यांच्या पक्षाचे काम आहे असे आव्हान बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले.
बेळगावात पत्रकारांशी बोलताना आ. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, ते जे बोलले त्याबाबत ग्रामीण भागातील जनताच निर्णय घेईल, समाजासाठी वाईट शब्द वापरले, त्यातून त्यांची संस्कृती दिसून येते. ते बोलले तर भाजप पक्ष काय करू शकतो. आपणही तसे बोलले तर आपली संस्कृती दिसून येईल. ग्रामीण भागात रस्त्यालगत तुमच्या समर्थकांचे बार आणि क्लब जास्त असल्याच्या रमेश जारकीहोळी यांच्या आरोपाला उत्तर देताना, केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. अधिकारी त्यांचे म्हणणे ऐकतात, मग उशीर कशाला करता असे प्रत्युत्तर हेब्बाळकर यांनी दिले. बाईट
माझ्या मतदारसंघातील लोक स्वाभिमानी आहेत. माझे काम ग्रामीण भागातील लोकांना आणि कुटुंबाना माहीत आहे. त्यांच्या मेळाव्यानंतर एका महिलेने त्यांना फैलावर घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे याचा खूप आनंद झाला आहे. माझे काम लक्षात ठेवणाऱ्या महिलेचे आभार असे त्या म्हणाल्या.
मी कोणतीही भेटवस्तू दिलेली नाही. मी ग्रामीण मतदार संघात रांगोळी स्पर्धा आयोजित केली, हळदी-कुंकू व अन्य कार्यक्रम आयोजित केला आणि विजेत्यांना बक्षिसे दिली. भेटवस्तू द्यायची असती तर ती पुरुषांनाही का देऊ नये. ते सुद्धा माझ्या मतदारसंघात आहेत. महिलांना मी स्वतःच्या घरची मुलगी म्हणून बोलावते. इतकी मोठ्या संख्येने मी केलेली पुरेशी विकासकामे त्यांना का दिसत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.
माझ्या मतदारसंघात माझ्याविरोधात बॅनर लावणारे आणि माझ्याविरोधात बोलणारे कोरोनाच्या काळात कुठे होते? त्यांनी जनतेचे काय केले आहे. मदतीला कोण आले, किती लोकांना मदत केली, पुराच्या वेळी ते कुठे होते, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. कोरोनाच्या काळात मी खूप काम केले आहे. भाजपने केलेल्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी त्यांनी स्वतःच काय ते सांगावे असे आव्हान आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले.
एकंदर, रमेश जारकीहोळी यांच्या आरोपांना आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी थंड डोक्याने उत्तरे दिल्याचे यावेळी दिसून आले.


Recent Comments