Athani

बेडरहट्टी गावाच्या जवानाचे आजाराने निधन

Share

राजस्थान येथे बेरूर मध्ये ,12 व्या बटालियनमध्ये लष्करी सेवा बजावणाऱ्या आणि बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील बेडरहट्टी गावाचा रहिवासी असलेला जवान पैगंबर जंगलसाब नदाफ (२९) यांचे आजाराने निधन झाले.

काही दिवसांपूर्वी पैगंबर जंगलसाब नदाफ काविळीची लागण झाल्याने ते रजेवर गेले होते आणि त्यांच्यावर हैदराबाद, दिल्ली, सांगली आणि महाराष्ट्रातील अथणीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र, ते बरे न झाल्याने अथणीहून बंगळुरूला अधिक उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

बेडरहट्टी ते चमकेरी गावापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली . यावेळी भारतमाता कि जय अशा घोषणा देण्यात आल्या . चमकेरी गावात पूर्ण शासकीय इतमामात , मुस्लिम धर्माच्या प्रथेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुटुंबाचा मुख्य आधार असलेला मुलगा गमावलेल्या कुटुंबीयांचे दु:ख शिगेला पोहोचले आहे. ही घटना ऐगली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

यावेळी , लष्कराचे अधिकारी आणि आसपासच्या गावातील लोकांनी अंत्ययात्रेस उपस्थित राहून , जवानाला श्रद्धांजली वाहिली .

Tags: