आ . अभय पाटील प्रस्तुत आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव यशस्वीपणे पार पडावा अशा शुभेच्छा बेळगावचे प्रादेशिक आयुक्त महांतेश हिरेमठ यांनी दिल्या .
व्हॉइस ओव्हर : बेळगावमधील मालिनी सिटी येथे आयोजित केलेल्या आ . अभय पाटील प्रस्तुत आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे उदघाटन करून ते बोलत होते . यावेळी त्यांनी ह्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन उत्तम केल्याचे सांगितले . याठिकाणी उत्सवाचे ,सणाचे वातावरण निर्माण झाल्याचे वाटत आहे . हा कार्यक्रम यशस्वी व्हावा अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या .
आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करणारे आ . अभय पाटील यांनी सर्वाना धन्यवाद देत या पतंग महोत्सवात विविध कार्यक्रम आयोजित केले असल्याचे सांगितले . सर्व माता भगिनींनी इतक्या सकाळीच उपस्थिती राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे . यावेळी त्यांनी बेळगाववासियांमुळेच हा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव यशस्वी होत असल्याचे सांगितले . यावेळी त्यांनी दिवाळीमध्ये आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण देखील यावेळी होणार असल्याचे सांगितले . या स्पर्धेत हजारो महिला सहभागी झाल्या होत्या . त्यातील सर्वोत्तम दहा रांगोळ्यांची निवड केली असून बक्षिसे देणार असल्याचे त्यांनी सांगितले .

यावेळी विविध ठिकाणाहून आलेल्या पतंगपटूंनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या .
स्वीझर्लंड येथून या पतंगमहोत्सवात सहभागी होण्यासाठी आलेल्या जेनीन या पतंगबाज महिलेने सांगितले कि , इथले लोक आणि वातावरण खूप छान आहे . आपण २० वर्षापासून पतंग उडवत आहोत . आणि माझ्याकडे ५० ते ६० प्रकारचे पतंग आहेत . पुन्हा इथे यावेसे नक्की वाटेल .
त्याचप्रमाणे बेळगावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कीर्ती सुरंजन यांनी कांतारा स्वरूपातील पतंग उडवला . त्या म्हणाल्या कि , आ . अभय पाटील यांनी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आयोजित करून , सर्वाना प्रोत्साहन देत आहेत . सर्वानी या पतंग महोत्सवाला या आणि विविध रंगाचे आकाराचे पतंग उडताना पहा आणि आनंद घ्या .
त्याचप्रमाणे ओरिसाहून आलेल्या पतंगबाजाने आय लव्ह बेळगाव असा पतंग उडवला . यावेळी त्याने आपण सहा वर्षांपासून अशा इव्हेंटमध्ये सहभागी होत असल्याचे सांगून, बेळगावमध्ये प्रथमच या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवासाठी आलो आहे , इथले वातावरण खूप उत्साही असल्याचे त्यांनी सांगितले .

या निमित्ताने बेळगाव दक्षिण मतदारसंघात दिवाळीमध्ये आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली . यामध्ये ५० उत्तेजनार्थ बक्षिसे तसेच दहा जणांना सर्वोत्तम रांगोळीची बक्षिसे देण्यात आली . यामध्ये प्रथम विजेत्या ठरलेल्या रुक्मीणी धारवाडकर याना पहिले पारितोषिक मिळाले . यावेळी त्यांनी आपली मराठीशी आपल्या भावना व्यक्त केल्या.
एकदंर बहुप्रतीक्षित अशा आंतरराष्ट्रीय पंतग महोत्सवाला मालिनी सिटी बेळगाव येथे सुरुवात झाली असून , चार दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत . लहान मुलांसाठी पतंग उडवण्यासहीत , डान्स , तसेच युथ फेस्टिवल , बलून फेस्टिवल , फॅशन शो , तसेच विविध कार्यक्रमांची रेलचेल या दरम्यान असणार आहे . बेळगावमधील या आंतरराष्ट्रीय पंतग महोत्सवाला बेळगावकरांचा अगदी शुभारंभापासूनच प्रचंड प्रतिसाद लाभत आहे .
एकंदरीत बेळगाव दक्षिणचे आ . अभय पाटील हे बेळगावकरांसाठी नेहमीच काही ना काही उपक्रम राबवत असतात . आता आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आयोजित करून बेळगाववासीयांना आणखी एक मनोरंजनाचा खजाना उपलब्ध करून दिला आहे .


Recent Comments