बसवण्णांच्या कल्पनेनुसार सुंदर समाज निर्माण व्हावा तसेच जातीभेद न मानता सर्व एकच आहोत ही भावना ठेवून वागले पाहिजे , असे सांगून बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अंबिगर चौडय्या जयंतीच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या .

बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने अंबिगर चौडाय्या जयंतीच्या निमित्ताने शहरात मिरवणूक काढण्यात आली . या मिरवणुकीचा शुभारंभ करून ते बोलत होते . अंबिगर चौडय्या जयंती राज्यशासनाकडून श्रद्धेने साजरी केली जात आहे . बेळगाव मध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित केलेल्या या अंबिगर चौडय्या जयंतीच्या त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या .
कर्नाटकातच नाही तर महाराष्ट्रात देखील ही जयंती साजरी केली जाते . विश्वगुरू बसवण्णा यांच्या नेतृत्वाखाली , धर्म ,जात तसेच शोषणाविरुद्ध नवी व्यवयसठ निर्माण करण्यासाठी लढा देणाऱ्या शरणांचे मी स्मरण करतो . बसवण्णांच्या कल्पनेतील सुंदर समाज निर्माण व्हावा , स्त्री आणि पुरुष ह्या दोनच जाती मानल्या पाहिजेत असे म्हणून त्यांनी उपस्थितांना अंबिगर चौडय्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या .

शहरातील अशोक सर्कलपासून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली . निजशरण अंबिगर चौडय्या यांच्या प्रतिमेचे , पालकमंत्री गोविंद कारजोळ, आ . अनिल बेनके , जिल्हाधिकारी नितेश पाटील , शहर पोलीस आयुक्त डॉ . एम बी बोरलिंगय्या , मनपा आयुक्त रुद्रेश घाळी तसेच समाजाचे अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे आदींनी पूजन केले .
मिरवणुकीमध्ये अंबारीवर निजशरण अंबिगर चौडय्या यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती . शिवाय जलकुंभ घेऊन समाजातील महिला देखील सहभागी झाल्या होत्या . झंजपथक आणि विविध कलापथके या मिरवणुकीत सहभागी झाली होती .
अशोक सर्कलपासून सुरु झालेली ही मिरवणूक , आरटीओ सर्कल मार्गे कुमार गंधर्व रंगमंदिरात नेण्यात आली .


Recent Comments