Belagavi

150 जागा जिंकण्यासाठी बूथ स्तरावर विजयसंकल्प अभियान : संजय पाटील

Share

आगामी विधानसभा निवडणुकीत 150 जागा जिंकण्याच्या उद्देशाने भाजपची पक्षसंघटना तळागाळातून मजबूत करण्यात येत आहे. या दृष्टीने 21 ते 29 जानेवारी या कालावधीत विजय संकल्प अभियान राबविण्यात येणार असल्याचे भाजप चिक्कोडी मंडल अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले.

याबाबत चिक्कोडी भाजप कार्यालयात माहिती देताना संजय पाटील म्हणाले की, भाजपने कार्यकर्त्यांना बुथ पातळीवर घरोघरी संपर्क साधून केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांची माहिती देऊन विजय संकल्प अभियान यशस्वी करण्याचे निर्देश दिले आहेत.

भाजपने बुथ स्तरावर सर्व घरोघरी संपर्क साधून, प्रत्येक घरापर्यंत शासनाच्या यशाबद्दल पॅम्प्लेट व स्टिकर्सचे वाटप, मिस कॉल देऊन सभासदत्व मोहीम, लाभार्थ्यांशी संपर्क साधून, 10 भित्तीपत्रके लिहिण्याचा तसेच प्रत्येक बुथ भागात एक डिजिटल भिंत लेखन करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी भाजप रयत मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दुंडाप्पा बेंडवाडे, जिल्हा सरचिटणीस सतीश आप्पाजीगोळ, भाजप कार्यालय चिटणीस आप्पासाहेब चौगले आदी उपस्थित होते

Tags: