धारवाडमध्ये 22 ते 26 जानेवारी दरम्यान होणाऱ्या मुरघेंद्र महास्वामी यांच्या 93 व्या जत्रा महोत्सव सोहळ्यात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना श्री मृत्युंजय महांत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे असे मुरुगा मठाचे डॉ. मल्लिकार्जुन स्वामीजी यांनी सांगितले.
धारवाडमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना मल्लिकार्जुन स्वामीजी म्हणाले, 22 जानेवारीला सकाळी षडस्थळ ध्वजारोहण होणार असल्याचे सांगितले. 23 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता शिवानुभव चिंतन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. श्री मृत्युंजय महांत पुरस्कार 25 जानेवारी रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले असून त्यांनी कार्यक्रमाला येण्याचे मान्य केले आहे. 26 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता श्री मदथनी मुरुगेंद्र स्वामींचा रथोत्सव होणार आहे. रथोत्सवाचा भाग म्हणून पाच दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments