Belagavi

तारिहाळ ग्राम पंचायतीमध्ये एस सी /एस टी अनुदानाचा वापर अन्य कामासाठी

Share

बेळगाव तालुक्यातील तारिहाळ ग्राम पंचायतीमध्ये , अनुसूचित जाती ,जमातींसाठी सरकारकडून आलेले अनुदान इतरत्र वापरले जात असल्याचा आरोप करून , डॉ . बी आर आंबेडकर शक्ती संघाने , ग्राम पंचायतीसमोर आंदोलन छेडले . यावेळी ग्राम पंचायतीमधील या अनागोंदी कारभाराची चौकशी केली जाईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले .

बेळगाव तालुक्यातील तारिहाळ ग्राम पंचायतीमध्ये , अनुसूचित जाती ,जमातींसाठी सरकारकडून आलेले अनुदान इतरत्र वापरले जात आहे .अनुसूचित जाती जमातींचे , 2018 ते 2022 या कालावधीतील 25 % अनुदान अन्य कामांसाठी वापरल्याचा आरोप डॉ . बी आर आंबेडकर शक्ती संघाने केला आहे . ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या विरोधात संघटनेमार्फत धडक मोर्चा काढण्यात आला .

यासंदर्भात डॉ. बी.आर. आंबेडकर शक्ती संघाचे संस्थापक यांनी सांगितले कि , बेळगाव तालुक्यातील तारिहाळ ग्रामपंचायतीतील पंचायत अधिकार्यांनी अनुसूचित जाती जमातींचे 25 % अनुदानाचा दुरुपयोग केला आहे . यामुळे दलित लोकांची फसवणूक झाली आहे . त्यामुळे याची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आमच्या हक्कासाठी तालुका पंचायत तसेच जिल्हा पंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढू असा इशारा दिला .

निवेदनाचा स्वीकार करून अधिकाऱ्यांनी , या प्रकरणाची पूर्ण चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले .
यावेळी तारिहाळ गावातील अनुसूचित जाती , अनुसूचित जमातीचे लोक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते .

Tags: