बेळगाव जिल्हा लेखिका संघाच्या वतीने बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवनामध्ये पुरस्कृत कार्यक्रमाचे म्हणजेच दत्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
दिवंगत वत्सला खडबडी, सावित्री शिवपुजी , तसेच गंगा कंबार यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता . या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित असलेल्या आरोग्य खात्याच्या सहसंचालिका डॉ . पुष्पा यांनी दिवंगत व्यक्तीच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची प्रशंसा व्यक्त केली .

जयशीला ब्याकोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात डॉ , ए के ईटगी , विजयालक्ष्मी पुट्टी , प्रतिभा कळ्ळीमठ , डॉ . भारती मठद , तसेच , जयश्री निराकारी , मुरुगेश शिवपुजी , तसेच यमुना कंबार आणि इतर उपस्थित होते .


Recent Comments