विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांना लहान मुलगाही घाबरत नाही आणि जगातील नंबर एकचे नेते नरेंद्र मोदी हे काँग्रेसच्या या खालच्या दर्जाच्या प्रचाराला घाबरतील काय अशी खिल्ली माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी उडवली आहे .
शहरामध्ये बोलताना त्यांनी सिद्धरामय्या यांच्या ,त्यांना नरेंद्र मोदी आणि आरएसएस आपल्याला घाबरतात या विधानावर प्रतिक्रिया दिली. आता जग मोदींचे कौतुक करत आहे. ते जगातील नंबर एकचे नेते आहेत .
त्यामुळे अशी खालच्या दर्जाची विधाने केल्याने त्यांचे व्यक्तिमत्व वाढणार नाही, राजकीयदृष्ट्याही ते वाढणार नाही, जगदीश शेट्टर म्हणाले


Recent Comments