येळ्ळूर गावातील पाटील गल्ली येथील शिवाजी महाराजांचा पुतळा जीर्ण झाल्याने त्या जागी नवीन अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती शिवानंद मठपती यांनी दिली .
बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावातील पाटील वाडीमध्ये प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या नव्या अश्वारूढ पुतळ्याची , शहरातील शिवाजी उद्यानापासून मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी माहिती देताना शिवानंद मठपती म्हणाले कि , छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना पुतळा जीर्ण झाल्याने त्या जागी दुसरा नवीन पुतळा बसवण्याचा निर्णय गल्लीतील तरुण मंडळींनी घेतला . कोल्हापूर येथून छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आणण्यात आला असून , शिवाजी उद्यानापासून आम्ही तो मिरवणुकीने येळ्ळूरला नेत आहोत . या मिरवणुकीत , भजनी मंडळ , गोंधळी मंडळ , ढोल पथक, इतर ग्राम पंचायतीचे सदस्य सहभागी झाले आहेत . या सर्वांच्या तसेच आ . अभय पाटील यांच्या सहकार्याने आम्ही या पुतळ्याची प्रतिष्ठापना करून लोकार्पण करणार आहोत .
शिवाजी उद्यानात या नवीन पुतळ्याचे पूजन करण्यात आले . त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात हे मिरवणूक येळ्ळूर गावाकडे मार्गस्थ झाली .


Recent Comments