Belagavi

लोककल्याणार्थ तसेच सकल जनहितार्थ श्री देवी अनुष्ठानाचे आयोजन

Share

प्रतिवर्षाप्रमाणे व सर्वांच्या सहकार्याने , श्री देवी अनुष्ठान करण्यात येत आहे .लोककल्याणार्थ तसेच सकल जनहितार्थ अनुष्ठान आयोजित केल्याची माहिती वेणुग्राम पुरोहित संघटनेचे संतोष जोशी यांनी दिली .

बेळगाव शहरातील , वडगाव येथील श्री बनशंकरी मंदिरामध्ये आयोजित केलेल्या श्री देवी अनुष्ठान कार्यक्रमाची ते माहिती देत होते . या अनुष्ठान कार्यक्रमाची सुरुवात शहापूर येथील अंबाबाई मंदिरापासून गोपूजा करून मिरवणुकीने करण्यात आली . शांतिपाठ , धर्मध्वजारोहण करून प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली . कुंकुमार्चन कार्यक्रम देखील पार पडला . देवीच्या कृपेसाठी , गोंधळ कार्यक्रम ,होम हवन विष्णुसहस्त्रनाम , ललितासहस्त्र नाम , प्रधान होम , पूर्णाहुती तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे . त्याचप्रमाणे या श्री देवी अनुष्ठानासाठी बेळगावसह , खानापूर , गोवा तसेच महाराष्ट्र इथून पुरोहित आले आहेत . अशी माहिती पुरोहित संतोष जोशी यांनी दिली .

या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून देवीचा कृपाप्रसाद प्राप्त करावा असे आवाहन, वेणुग्राम पुरोहित संघटनेकडून करण्यात आले आहे .

Tags: