बेळगावात 29 जानेवारीला प्रख्यात नवोदित युवा गायक दर्शन रावल यांचा “मॅजिकल इव्हनिंग विद दर्शन रावल” हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
शहरात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देताना प्रगती महिला अभिवृद्धी संघाच्या अध्यक्षा रूपा शेखर यांनी सांगितले की, बेळगाव जिल्हा क्रीडांगणावर येत्या 29 जानेवारीला सायंकाळी 6 वा प्रख्यात नवोदित युवा गायक दर्शन रावल यांचा “मॅजिकल इव्हनिंग विद दर्शन रावल” हा कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रगती महिला अभिवृद्धी संघाच्या वतीने “आनंदयात्री” नामक वृद्धाश्रम चालविण्यात येतो. मंडोळी रोडवरील संस्कृती पामच्या जवळ हा वृद्धाश्रम चालविण्यात येत असून तेथे 15 ज्येष्ठ नागरिक राहतात. सध्या वृद्धाश्रमाला जागा कमी पडत आहे.
त्याचप्रमाणे निवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अधिक चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यासाठी निधी जमविण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. “मॅजिकल इव्हनिंग विद दर्शन रावल”मध्ये युवा नवोदित प्रतिभावान गायक दर्शन रावल यांचा जादुई आवाज ऐकायला मिळणार आहे. त्याशिवाय सायना कॅथरीन देखील गायन सादर करणार आहे. त्याचा सर्वानी लाभ घेऊन आमच्या कार्याला हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शेखर, मनोज, मंजुनाथ गड्डेन्नावर, अमित पाटील आणि अन्य आयोजक उपस्थित होते.


Recent Comments