अथणी येथील 110 केव्ही वीज केंद्रात भीषण आग लागली आहे . ह्या आगीचे लोळ मोठ्या प्रमाणावर पसरून संपूर्ण वीज केंद्राला आगीने वेधले आहे . नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अथणी शहरातील विजापूर रोडला जोडलेल्या वीज केंद्रात सकाळी 09.15 च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे .
आगीची तीव्रता वाढल्याने लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले असून, अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. जीवितहानी आणि नुकसानीची अधिक माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.


Recent Comments