Belagavi

सुळेभावीत आ . लक्ष्मी हेब्बाळकर आणि एमएलसी चन्नराज हट्टीहोळी यांचे रांगोळीतून चित्रण

Share

बेळगाव ग्रामीण भागात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या ग्रामीण उत्सवाची सांगता झाली आणि शेवटच्या दिवशी सुळेभावीतील विविध घरांसमोर लावलेल्या रांगोळ्यांनी लक्ष वेधून घेतले. विशेषत: सुळेबावी महालक्ष्मी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांचे रांगोळीत सुंदर चित्रण करण्यात आले आहे.

हर्षा शुगर्सने संपूर्ण ग्रामीण मतदार संघामध्ये ग्रामीण उत्सवाचे आयोजन केले होते. प्रत्येक गावातील घरासमोर आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी रांगोळी काढण्याची स्पर्धा घेण्यात आली. संपूर्ण मतदारसंघातील लाखो लोक या भव्य स्पर्धेत सहभागी झाले होते. विजेत्यांना, सहभागींनाही विशेष पारितोषिके देण्यात आली.

शेवटच्या दिवशी सुळेबावी येथील रवी मुलंगी यांच्या घरासमोर सुळेभावी श्री महालक्ष्मी देवीचे चित्र रांगोळीतून रेखाटण्यात आले आहे. सुळेभावी ग्रामपंचायत अध्यक्ष महेश सुगणेण्णावर यांच्या घरासमोर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांचे चित्र रांगोळीत रेखाटण्यात आले आहे. या रांगोळ्या पाहून खुद्द लक्ष्मी हेब्बाळकर आणि चन्नराज हट्टीहोळी आनंदित झाले.


गावातील जवळपास प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी काढण्यात आली असून सर्वजण त्याचा आनंद घेत आहेत. मोरासह विविध पक्षी, श्रीकृष्ण-राधेसह विविध देवांच्या प्रतिमा, बासरीवादक, निसर्गाच्या प्रतिमा रांगोळीत रेखाटण्यात आल्या आहेत.
एकूणच, या 15 दिवसांच्या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला .

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विकासकामांसोबतच आपल्या संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.

Tags: