Chikkodi

२१ व २२ जानेवारी दोन दिवस भव्य महोत्सवाचे आयोजन

Share

चिक्कोडी तालुक्यातील अंकली गावातील गोमटेश शिक्षण संस्थेच्या वतीने २१ व २२ जानेवारी असे दोन दिवस भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. हर्षवर्धन मगदुम यांनी सांगितले.

चिक्कोडी तालुक्यातील अंकली श्री गोमटेश शिक्षण संस्थेच्या सभा भवनात पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, 21 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता डॉ. एन ए मगदुम् आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्राच्या पहिल्या तुकडीच्या विद्यार्थ्यांसाठी पदवीदान समारंभ आयोजित केला जाईल. आरजीयूएचएस विद्यापीठाचे कुलगुरू डॉ एम के रमेश प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य धन्यकुमार गुंडे, माजी आमदार एस.बी. घाट हे पाहुणे म्हणून येणार आहेत. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक डॉ एन.ए. मगदुम राहणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली .

त्यादिवशी सायंकाळी ४ वाजता डॉ. एन ए मगदुम सिबीएसइ शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. 22 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता वार्षिक स्नेहसंमेलन होणार आहे. प्राचार्य राघवेंद्र कुलकर्णी, एस जी ई एस चे सचिव सुरेश चौगला यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष एन.ए. मगदुम, खजिनदार ललिता मगदुम येणार आहेत.

यावेळी सीबीएसइ शाळेचे प्राचार्य एन. एस. निडगुंदी, डॉ. रमेश टी. के. सच्चिदानंद यावेळी उपस्थित होते.

Tags: