बेळगाव उत्तर तसेच दक्षिण मतदारसंघात २ फेब्रुवारीपासून बूथ विजय अभियान तसेच विजय संकल्प अभियान सुरु होणार असल्याची माहिती आ . अभय पाटील यांनी दिली .
या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले कि , बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात २ फेब्रुवारीपासून दहा दिवस बूथ विजय अभियान तसेच विजय संकल्प अभियान चालणार आहे . मतदार संघातील सर्व बूथ स्तरावर हा कार्यक्रम होणार आहे . घरोघरी भाजपचा ध्वज लावला जाणार आहे . शिवाय “माझे घर भाजपचे घर” या आशयाचे स्टिकर घरांवर तसेच वाहनांवर चिकटवण्यात येणार आहेत . शिवाय दोन्ही मतदारसंघातील घरोघरी जाऊन , केंद्र तसेच राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी , लोकोपयायोगी योजनांची माहिती देण्यात येणार आहे . त्याचप्रमाणे , समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार देखील केला जाणार आहे .
मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर , प्रथमच देशातील बांधकाम कामगारांसाठी तसेच त्यांच्या मुलांसाठी सरकारने कल्याणकारी योजना उपलब्ध करून दिल्या आहेत . राज्यात मुख्यमंत्री बोम्मई तसेच कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांनी देखील बांधकामं कामगारांच्या हिताच्या दृष्टीने पावले उचलली आहेत . त्याचप्रमाणे बेळगाव दक्षिणमध्येही ही योजना राबली असून विणकरांची देखील सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे .
या पत्रकार परिषदेमध्ये , बेळगाव उत्तरचे आ . अनिल बेनके , एम बी जिरली , मुरगेन्द्रगौडा पाटील आदी उपस्थित होते .


Recent Comments