Chikkodi

पाण्याच्या पाइपलापाइपलाईनची गळती थांबवण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष

Share

चिक्कोडी तालुक्यातील अंकली गावात अनेक दिवसांपासून रस्त्याच्या मधोमध पाईप लाईनला गळती लागली आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ग्रामपंचायतीने पापाईपलाईन दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

अंकली गावच्या बसस्थानकाजवळील अंकली रोडवर पाईप लाईनला गळती लागून बरेच दिवस झाले आहेत. चिक्कोडी, मीरजसह अनेक वाहने येण्याबरोबरच ऊसाने भरलेले ट्रॅक्टरही या रस्त्यावरून जात आहेत.

येथे दररोज अपघात होत असल्याने व्यावसायिकांनी या रस्त्यावर बॅरिकेड घालून इशारा दिला होता . मात्र या रस्त्यावरील बसस्थानक इमारतीमुळे वाहतुकीची मोठी समस्या आहे. अधिकारी ऐकून घ्यायला तयार नाहीत.

अंकलीत या फुटलेल्या पाईपलाईनमधून हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे . ह्या रस्त्यावर चिखलमय गलिच्छ वातावरण निर्माण झाले आहे . पावसाळ्यासारखी स्थिती या ठिकाणी दिसत आहे . गळती होऊन बरेच दिवस झाले आहेत . मात्र याकडे कोणाचेही लक्ष नाही. आणि अपघात होत आहेत. ही पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करून जनतेला सोयीचे करून द्यावे असे आव्हान बाळासाहेब कोटी वझे यांनी केले आहे.

तरी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ ही गळती रोखून जलप्रदूषण व अपघात टाळावेत.

Tags: