केंद्र व राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना लोकांसमोर ठेवण्याच्या उद्देशाने 21 ते 29 जानेवारी दरम्यान भाजप विजय संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी सांगितले.
यासंदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते माहिती देत होते . आगामी विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर , भाजपाला ग्रामीण भागात बूथ स्तरावर मजबूत करण्यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे . प्रत्येक घरी जाऊन , केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लोकोपयोगी योजना तसेच उपक्रम सांगितले जाणार आहेत . त्याचप्रमाणे राज्यातील मुख्यमंत्री , आमदारांनी केलेली विकास कामे , अमलात आणलेल्या योजनांची घरोघरी माहिती दिली जाणार आहे . त्याच प्रमाणे ” माझे घर , भाजपचे घर ” असे स्टिकर चे वितरण करण्यात येणार आहेत . राज्य सरकारने
उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी अनेक योजना जारी केल्या आहेत . या योजनांची माहिती देखील या अभियानाद्वारे दिली जाणार आहे .
काँग्रेसने खोटे बोलून ७५ वर्षे सत्ता उपभोगली आहे . खोटी आश्वासने दिली आहेत . मात्र ते आता जे आश्वासने देत आहेत ते पूर्ण करण्याची संधीच त्यांना मिळणार नाहीय . कर्नाटकाची जनताच त्यांना दूर ठेवणार आहे . असे ते म्हणाले . बेळगाव महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक संविधानात्मक रीत्याच केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले .
भाजपचे प्रदेश प्रवक्ते एम.बी.जिरली यांनी जिल्ह्यातील आनंद मामनी सारख्या भाजप नेत्यांच्या मृत्यूमुळे , बेळगावच्या विकासाला खीळ बसत असल्याची चिंता व्यक्त केली.
पत्रकार परिषदेत भाजपचे बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आ . संजय पाटील , सुभाष पाटील , संदीप देशपांडे आणि अन्य भाजप नेते उपस्थित होते
एकंदर विधानसभा निवडणुकीत भाजपाला बूथस्तरावर मजबूत करण्यासाठी भाजपकडून विजय संकल्प अभियान घेण्यात येणार आहे .


Recent Comments