देशात होणाऱ्या बजरंग दल तसेच विश्व हिंदू परिषदेसहीत हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांचा हत्या रोखा अन्यथा आम्ही कायदा हातात देऊ असा इशारा बेळगावमध्ये बजरंग दल तसेच विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आला .
या संदर्भात बजरंग दल तसेच विश्व हिंदू परिषदेकडून बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले .
यावेळी बोलताना , संघटनेचे बसवराज भागोजी तसेच भवाकांना लोहार यांनी सांगितले कि देशात हिंदू संघटनांच्या सदस्यांच्या हत्या केल्या जात आहेत . मागील २ वर्षात बजरंग दलाचे ९ मिळून एकूण ३२ हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्या . जिहादींचे मनपरिवर्तन करण्याचे काम मदरशांमध्ये केले जात आहे . त्यामुळे असे मदरसा बंद करा अशी मागणी यावेळी त्यांनी केली .
यावेळी ए एम कर्लिंगंणावर , यु आय चिंडक , आदिनाथ गावडे , गणेश चौगुले , हेमंत हवाल , विजय जाधव आदी उपस्थित होते . यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले .


Recent Comments