Belagavi

मुलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने करावे काम

Share

मुलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.असे आवाहन बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष के. नागण्णगौडा यांनी केले .

शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी सांगितले कि , मुलांवरील अत्याचार , हिंसाचार ही चिंताजनक , गंभीर बाब आहे . काही ठिकाणी वडील आणि शिक्षक देखील मुलांवर अत्याचार करत आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आयोग कारवाई करेल.

पोस्को आणि इतर कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, गावपातळीवर समितीच्या माध्यमातून बालहक्कांचे संरक्षण आणि प्रतिबंध यासाठी कार्यवाही करण्याचा मानस आहे.
दीड महिन्यात 26 जिल्ह्यांचा दौरा करणार आहे .

शहरात प्रभागस्तरीय समिती स्थापन करणार असून बालविवाह रोखण्यासाठीही आयोग कारवाई करेल.
सुमोटोनुसार स्वेच्छेने नोंदणी केली जाईल .
बालकांच्या हक्कांच्या संरक्षणासोबतच मुलांच्या जबाबदाऱ्यांबाबत जागरूकता निर्माण करण्याचे काम केले जात आहे. याआधीही काही प्रकारच्या समित्या होत्या. त्यांना गती देण्याचे काम केले जाईल.

बालकांचे लैंगिक शोषण, बालविवाह, बालमजुरी आदी प्रकरणांमध्ये सर्व संबंधित विभागांना समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सक्त सूचना देण्यात येतील.
कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा आयोगाचे अध्यक्ष के. नागण्णगौडा यांनी दिला आहे .
पत्रकार परिषदेला महिला व बालविकास विभागाचे उपसंचालक बसवराज उपस्थित होते.

Tags: