100 कोटींच्या खंडणीसाठी , केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या हिंडलगा कारागृहातील
आरोपी जयेशला चौकशीसाठी नागपूर पोलीस न्यायालयाच्या परवानगीने 7 दिवसांच्या पोलीस कोठडीत घेण्याची शक्यता आहे .
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाच्या अधिकाऱ्यांच्या परवानगीने नागपूर पोलीस जयेश कांता याची चौकशी करीत आहेत . या चौकशी दरम्यान त्याच्याकडून एक डायरी जप्त करण्यात आली असून डायरीत अनेक फोन नंबर असल्याची माहिती मिळाली आहे . जयेश पुजारीला आज ना उद्या पोलिस कोठडी मिळण्याची शक्यता आहे. त्याला न्यायाधीशांसमोर हजर करून 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली जाऊ शकते . नंतर जयेश पुजारीला महाराष्ट्रात नागपूरला नेले जाण्याची शक्यता आहे अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे . देशातील सर्वात जुने असलेल्या हिंडलगा कारागृहात कर्नाटक सरकारने सुधारणा केलेली नाही. राज्य सरकारच्या बेजबाबदारपणामुळे व्यापारी आणि राजकारण्यांना जीवाची भीती लागून राहिली आहे .
देशात 5G नेटवर्क लाँच करूनही हिंडलगा कारागृहात 2G जॅमर बसवण्यात आले आहेत . तुरुंगात 2 जी जॅमरमुळे कैदी 4 जी फोन सहज वापरत आहेत
कैद्यांच्या 4 G मोबाईल फोन नेटवर्कवर 2G जॅमर बसवण्याचा परिणाम काहीच होत नसल्याने कारागृहातूनच व्यापारी व राजकीय नेत्यांना कैद्यांकडून धमक्या दिल्या जात आहेत
4G जॅमर बसवले असते तर , नेटवर्क जाम होऊन फोन कॉल्समध्ये व्यत्यय निर्माण झाला असता . आता सरकारला नेटवर्क अपग्रेडनुसार जॅमर लावण्याबाबत पुढाकार घ्यावा लागणार आहे .
कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे . त्यांनी हि बाब शासनाच्या निदर्शनास आणायला हवी होती . कारागृह अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बेळगाव आणि महाराष्ट्र पोलिसांची धावपळ झाली आहे .
Recent Comments