Belagavi

सरकारी कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचा प्रारंभ

Share

अँकर : संघटना असेल तर न होणारी कामे देखील होतात , त्यामुळे संघटनात्मक रित्या क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होऊन , राज्यपातळीवर आपली चमक दाखवा असे आवाहन , प्रादेशिक आयुक्त एम जी हिरेमठ यांनी केले आहे .
व्हॉइस ओव्हर : बेळगावच्या जिल्हा क्रीडांगणावर आयोजित केलेल्या, सरकारी कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उदघाटन करून ते बोलत होते . ते म्हणाले कि , प्रत्येक क्षेत्रात संघटना महत्वाची आहे . संघटनेमुळे अनेक कामे सहजासहजी होतात . जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी व्हा आणि राज्यपातळीवरील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन तुमची चमक दाखवा असे त्यांनी सांगितले .

यावेळी जिल्हा पंचायत सीईओ दर्शन यांनी आपण सुद्धा एक खेळाडू असल्याचे सांगितले . सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शारीरिक आणि मानसिक स्वास्थासाठी स्पोर्ट्स आवश्यक असल्याचे ते म्हणाले . त्यामुळे प्रत्येकाने वेळात वेळ काढून खेळ खेळले पाहिजेत . हारजीत असा विचार न करता , खेळाडूवृत्तीने या स्पर्धांमध्ये सहभागी व्हा असे ते म्हणाले .
तर सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बसवराज रायगोळ यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी संघटना 24 तास कार्यरत असल्याचे सांगितले . सरकारी कमर्चाऱ्यांसाठी क्रीडा स्पर्धांबरोबरच , सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत . कर्मचाऱ्यांच्या काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर सोडवू त्याचप्रमाणे एनपीएस ची मागणी मान्य करून घेऊ असे सांगितले .

यावेळी , बेळगाव शहर पोलीस आयुक्त डॉ . एम.बी. बोरलिंगय्या , बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे , अपार जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी , उपविभागाधिकारी बलराम चव्हाण , डी एस डिग्रज त्याचप्रमाणे दलित नेते मल्लेश चौगुले , सिद्धाप्पा कांबळे आदी उपस्थित होते

Tags: