बेळगाव शहरामध्ये सरदार्स मैदानावर आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे असे आ . अनिल बेनके यांनी सांगितले .
व्हॉइस ओव्हर : मागील आठवड्यापासून बेळगावमधील सरदार्स मैदानावर , आ . अनिल बेनके आयोजित क्रिकेट स्पर्धा सुरु आहेत . या स्पर्धांमध्ये कर्नाटकासहित , महाराष्ट्र , गोवा , जम्मू काश्मीर राज्यातील क्रिकेट संघ सहभागी झाले आहेत . दररोज , दहा षटकांचे ४ सामने खेळवले जात आहेत .
सर्व मॅचेसना क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे .
सोमवारच्या सामन्यांमध्ये एस आर एस संघ विरुद्ध मोहन मोरे संघात सामना झाला . अतिशय रोमांचक असे हे सामने झाले .
यावेळी बोलताना आ . अनिल बेनके म्हणाले कि , अपेक्षेहून अधिक प्रतिसाद या स्पर्धेला लाभला आहे . सर्व बेळगाववासीयांचे तसेच सर्व सहकार्य करणाऱ्या सर्वाना धन्यवाद देतो . बुधवारी स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे . सर्वानी हा सामना पाहण्यासाठी नक्की यावे असे आवाहन त्यांनी केले .

त्यानंतर बोलताना विश्व हिंदू परिषदेचे विजय जाधव म्हणाले कि , अतिशय शिस्तबद्ध रित्या , आ . अनिल बेनके यांनी हे सामने भरवले आहेत . बेळगावमध्येही बरेच क्रिकेटपटू आहेत . ह्या स्पर्धा आयोजित करून त्यांनी त्या खेळाडूंना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे .

बऱ्याच कालावधीनंतर , भव्य प्रमाणावर भरवलेल्या या क्रिकेट स्पर्धाना क्रिकेटप्रेमींचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे .


Recent Comments