योगाथन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर धारवाडमधील चार स्टेडियममध्ये आज झालेल्या योगासन कार्यक्रमात हजारो तरुण-तरुणींनी सहभाग घेतला आणि गिनीज रेकॉर्डच्या दिशेने पाऊल टाकले.
धारवाडमधील आर. एन. शेट्टी स्टेडियम, धारवाड, राणी चेन्नम्मा स्टेडियम, कर्नाटक विद्यापीठ, जेएसएस कॉलेज मैदान, कृषी विद्यापीठ स्टेडियम या ठिकाणी झालेल्या योगाथन कार्यक्रमात हजारो लोक योगासने करण्यासाठी जमले होते.

हुबळी व धारवाड येथे हा युवा महोत्सवाचा कार्यक्रम पाच दिवस चालला असून आज चौथ्या दिवशी रविवारी योगाचा कार्यक्रम चार ठिकाणी पार पडला. योग कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी देखील सहभागी झाले होते. आमदार अमृत देसाई यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वतंत्रपणे योगा कार्यक्रमाचे उदघाटन करून त्यात सहभाग घेतला. राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी जमलेल्या विविध राज्यातील तरुण-तरुणींनी थंडीची पर्वा न करता योगासनात सहभाग घेतला हे विशेष.
दरम्यान, योगाथनमध्ये सहभागी होण्यासाठी धारवाड जिल्हा पालक मंत्री हालप्पा आचार शेवटपर्यंत आले नाहीत. त्यामुळे सभापती होरट्टी यांनी नाराजी व्यक्त केली.


Recent Comments