भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात 100 कोटी रुपयांची खंडणी मागणारा फोन बेळगावमधील हिंडलगा तुरुंगातून देण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी हिंडलगा कारागृह प्रशासनाच्या परवानगीने नितीन गडकरी धमकी प्रकरणाची चौकशी सुरु असल्याची माहिती नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली .
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात 100 कोटी रुपयांची खंडणी मागणारा फोन कॉल आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. 100 कोटी रुपये न दिल्यास बॉम्बस्फोट घडवून आणून गडकरींना संपवू अशीही धमकी या फोनकॉलद्वारे देण्यात आली होती. दरम्यान, ही धमकी बेळगावमधील हिंडलगा तुरुंगातून देण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे . केंद्रीयमंत्री नितीन गडकरी धमकी देणाऱ्या तुरुंगातील व्यक्तीचे नाव जयेश कांता असे आहे
नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचारी जितेंद्र शर्मा यांनी नागपूर पोलिसांकडे तक्रार केली होती.
शनिवारी सकाळी 11.29 वाजता नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील फोन नंबरवर खंडणी साठी फोन केला.
आणि मी दाऊद टोळीतून बोलत आहे. गडकरींना 100 कोटी रुपये रोख पाठवायला सांगा.अन्यथा गडकरी सापडतील तिथे बॉम्ब फोडून त्यांना ठार मारू.मला त्यांचे कार्यालय माहीत आहे, अशी धमकी दिली.
पैसे कुठे पाठवायचे, असे विचारले असता, बंगळुरू, कर्नाटकला पाठवा, असे सांगितले.
याबाबत गडकरींचा बंदूकधारी दीपक याला कर्मचाऱ्यांनी सांगितले.
त्यानंतर 11.37 वाजता गडकरींना पुन्हा फोन केला आणि आरोपीने आपला मोबाईल नंबर दिल्यानंतर संपर्क करण्यास सांगितले. यावेळी 8139923258 हा फोन नंबर जयेश याने दिला होता .
या प्रकरणाची पोलिसात तक्रार केल्यास परिणाम वाईट होतील , असे सांगून फोन कट केला होता .
नंतर 12.29 वाजता कैदी जयेश याने पुन्हा फोन केला. यावेळी त्याने गडकरींनी त्यांना माझ्या संदेशाबद्दल सांगितले का? असा प्रश्न केला तेव्हा कर्मचारी म्हणाले की साहेब व्यस्त आहेत.
मला तुझे नाव व पत्ता सांगा असे विचारले असता कैद्याने सांगितले की, तू ही रोकड कर्नाटकला पाठव आणि तिथून मला सांग. धंतोली पोलीस स्टेशन, नागपूर येथे नोंदवलेल्या एफआयआरमध्ये या सर्व तपशीलांचा उल्लेख आहे.
आयपीसी कलम 1860 कलम 385, 387, 506/2, 507 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी नागपूर पोलिसांनी बेळगाव पोलिसांशी संपर्क साधून हिंडलगा कारागृहातील कैदी जयेशकडून डायरी जप्त केली आहे .
याप्रकरणी नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हिंडलगा कारागृह प्रशासनाच्या परवानगीने चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले .
2008 मध्ये जयेश नावाचा आरोपी हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात होता
2018 मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती
त्याने तुरुंगातून पळून जाण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती आहे
, नागपूर पोलीस सध्या तपास करत आहेत असे नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले .
एकंदरीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याना हिंडलगा कारागृहातूनच धमकीचा फोन गेल्याचे नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले असून आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली .


Recent Comments