मकरसंक्रातीच्या शुभदिनी राज्याला देशातील पहिले ‘योग साक्षरता राज्य’ बनविण्याचा एक भाग म्हणून योग कामगिरीसाठी गिनीज रेकॉर्ड प्रस्थापित केल्याच्या निमित्ताने , तसेच राष्ट्रीय युवा दिनानिमित्त शहरातील गोल्फ मैदानावर , योगथॉन-२०२३ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. .
जिल्हा प्रशासन तसेच आयुष विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात एनएसएस, एनसीसी, शाळेचे विद्यार्थी तसेच विविध योग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने योगथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

आ . अनिल बेनके तसेच आयुषचे डॉ . श्रीकांत सुंधोली यांच्या नेतृत्वाखाली या योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . यावेळी उपस्थित मुलांनी विविध योग प्रात्यक्षिके सादर केली .
यावेळी या योग कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या शिक्षकांनी आपली प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली .
यावेळी आ . अनिल बेनके यांनी मोठ्या प्रमाणावर योग कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वाना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या .
यावेळी उत्तम रित्या योग प्रात्यक्षिके सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले .


Recent Comments