नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक ७२ लोक घेऊन जाणारे विमान अपघातग्रस्त झालं आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्वांचा मृत्यू झाला आहे. या विमानात ६८ प्रवाशी आणि चार क्रू सदस्य होते. एटीआर-७२ हे प्रवासी विमान ७२ जणांना घेऊन काठमांडू ते पोखरा या मार्गावर होते. या विमानाने आज सकाळी साडेदहा वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं.
पोखरा विमानतळावर लँडिंग करण्याच्या दहा सेकंद आधी हे विमान अपघातग्रस्त झाले आहेत. या विमानातील सर्वजण मृत पावल्याचं वृत्त एका खासगी वृत्तवाहिनीने दिलं आहे. हे विमान पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काही अंतरावर असणाऱ्या सेती गंडकी नदीच्या काठावरील जंगलात कोसळलं.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, ही दुर्घटना रविवारी सकाळी 8 च्या सुमारास घडली. बचाव पथकाने स्थानिकांच्या मदतीने बचाव व मदत कार्य सुरू केले आहे. माध्यमांनी दुपारी 12 च्या सुमारास या अपघाताचे वृत्त दिले.
5 भारतीयांसह 9 परदेशी नागरीक
कमल के सी हे या विमानाचे कॅप्टन होते. विमानातील 68 प्रवाशांत 53 नेपाळी, 5 भारतीय, 4 रशियन, 1 आयरीश, 2 कोरियन, 1 अफगाणी व एका फ्रेन्च व्यक्तीचा समावेश होता. यात 3 नवजात बाळांसह व 3 मुलांचाही समावेश होता. एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बरतौला यांनी सांगितले की, आतापर्यंत एकाही व्यक्तीला जिवंत बाहेर काढता आले नाही.
वैमानिकाने 2 वेळा मागितली लँडिंगची परवानगी
पोखरा एअरपोर्ट एटीसीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, ही दुर्घटना रनवेपासून अवघ्या काही मीटर अंतरावर घडली. पोखराची धावपट्टी पूर्व-पश्चिम दिशेने आहे. पायलटने पूर्वेच्या बाजूने लँडिंगची परवानगी मागितली होती. त्याला ती मिळालीही होती. पण थोड्याच वेळात त्याने पुन्हा पश्चिम दिशेने लँडिंगची परवानगी मागितली. त्याला ती पुन्हा देण्यात आली. पण लँडिंगपूर्वी 10 सेकंद अगोदर हा विमान अपघात झाला.
डेमो फ्लाय करणारेच विमान पडले
यती एअरलाइन्सचे हे 9N ANC विमान होते. याच विमानाने पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2023 रोजी डेमो उड्डाण केले होते. या विमानची क्षमता 70 प्रवाशांची होती. त्याचा कमाल वेग 309 मैल म्हणजे ताशी 500 किलोमीटर एवढा होता. 2 इंजिन असणाऱ्या या विमानाला प्रॅट अँड व्हिटनी PW 127 इंजिन होते.
Recent Comments