Belagavi

सोहम मुकुंद ओझा यांची महाराष्ट्र संघात निवड

Share

महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशन यांचे मार्फत धुळे येथे सब ज्युनिअर राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेतून कोल्हापूर जिल्हयाचे प्रतिनिधित्व करणारा व्यंकटेश्वर इंग्लिश स्कूल,कबनूरचा विद्यार्थी सोहम मुंकुद ओझा याची महाराष्ट्र संघासाठी निवड करण्यात आली आहे .

बेळगाव येथे होणाऱ्या 15 व्या सब ज्युनिअर राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघामधून तो खेळणार आहे. येथील सत्यनारायण जोशी (नागोरी) यांचा सोहम हा नातू असून या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Tags: