विजापूर जिल्ह्यातील चडचण शहरात श्री संगमेश्वर शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात लिंगैक्य सिद्धेश्वर स्वामीजींना वंदन करण्यासाठी जनता व विद्यार्थ्यांचा श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या गर्दीच्या मध्यभागी एक श्वान स्टेजवर आला, शतकातील संत, महान ज्ञानयोगी सिद्धेश्वर श्री यांच्या चित्रासमोर उभा राहिला आणि कुठेही न हलता तिथेच थांबून राहिला . एका श्वानाने श्रींच्या प्रती भक्ती दाखवल्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले. संस्थेच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी श्रींना नतमस्तक होऊन आदरांजली वाहिली.


Recent Comments