Belagavi

सिद्धरामेश्वरांचे विचार तरुण पिढीने मनात रुजवायला हवेत

Share

सिद्धरामेश्वर यांनी बसवण्णांच्या वचनानुसार जीवन जागून , त्याप्रमाणे जनतेमध्ये संदेश दिला . आज त्यांच्या विचारांमुळेच आमच्या देशात एकी दिसत असल्याचे कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सरस्वती भगवती म्हणाल्या .

बेळगाव मधील कुमार गंधर्व रंगमंदिर येथे , जिल्हाप्रशासन , जिल्हा पंचायत , कन्नड आणि संस्कृती विभाग आणि महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर जयंती साजरी करण्यात आली .

यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित असलेल्या सरस्वती भगवती यांनी शिवयोगी सिद्धेश्वरांबद्दल विचार मांडले . सिद्धरामेश्वर हे बसवण्णांचे चाहते होते . त्यांच्या वचनानुसार , ते जीवन जगले आणि लोकांना संदेश दिला . आज अशा मोठ्या विचारवंतांच्या विचारांमुळे , आमचा देश आज एकीने पुढे जात आहे . असे विचार तरुण पिढीने मनात रुजवायला हवेत . असे त्या म्हणाल्या .

प्रारंभी अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी यांनी या कार्यक्रमाचे उदघाटन केले .
यावेळी कन्नड आणि संस्कृती विभागाच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री , तसेच भोईवड्डर समाजाचे अध्यक्ष एल जे गाडीवड्डर आदी उपस्थित होते .

Tags: