Belagavi

जिजाऊ आणि शिवबा हे आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणा ठरावेत : प्रा . मायाप्पा पाटील

Share

जिजाऊ आणि शिवबा हे आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणा ठरावेत यासाठी शिवचरित्राचे वाचन घरोघरी होणे गरजेचे आहे. शिवराय पुतळ्यात आहेत, पुस्तकात आहेत, चौकाचौकात आहेत परंतु शिवराय विचारात आणि आचरणात आणणे अत्यंत महत्वाचे आहे. असे विचार प्रा . मायाप्पा पाटील यांनी मांडले .

व्हॉइस ओव्हर : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठा मंदिर कार्यालयाच्या सभागृहात युवा दिनानिनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून आरपीडी महाविद्यालयाचे प्रा. मायाप्पा पाटील आणि कार्वे येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रा. गीता संजय मुरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या तत्वाला अनुसरून प्रा. मायाप्पा पाटील बोलताना म्हणाले, शिवराय जन्माला घालण्यासाठी जिजाऊ निर्माण होणे गरजेचे आहे.

जिजाऊ आणि शिवबा हे आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणा ठरावेत यासाठी शिवचरित्राचे वाचन घरोघरी होणे गरजेचे आहे. शिवराय पुतळ्यात आहेत, पुस्तकात आहेत, चौकाचौकात आहेत परंतु शिवराय विचारात आणि आचरणात आणणे अत्यंत महत्वाचे आहे. शिवराय हे पुस्तक नव्हेत, शिवराय पुतळ्यापुरते मर्यादित नव्हेत, शिवराय म्हणजे एक विचार आहे, संस्कार आहे. हा संस्कार प्रत्येकाच्या मनात रुजणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणादायी इतिहासाबद्दल त्यांनी तरुणाईला उद्देशून भाषण केले. ३९ वर्षाच्या जीवनात विवेकानंदांनी घडविलेले कार्य अमूल्य असून आपण किती जगलो यापेक्षा कसे जगलो हे महत्वाचे असून यानुसार आजच्या तरुणाईने जीवनाचा मार्ग निवडावा, असा सल्ला त्यांनी दिला.

यावेळी बोलताना प्रा . गीता मुरकुटे म्हणाल्या कि , आजकाल स्वाभिमान विकलेले , लाचार , दुबळे , तरुण आजूबाजूला पाहायला मिळतात . आज घराघरात जन्माला येणाऱ्या युवा पिढीने आणि मातांनी जिजाऊ आणि शिवबाच्या इतिहासाची आणि विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या विचारांची उजळणी करणे आवश्यक आहे . हल्ली मोबाईलमधील गोष्टींचे मुले अनुकरण फार लवकर करतात . त्यामुळे योग्य वेळेतच पुस्तकातील विचारातून , विचारमंथन करून पिढी घडवणे , युवा पिढीला डोळस बनवणे अत्यावश्यक आहे . यासाठी पालकांमध्ये जागरूकता आली पाहिजे असे त्या म्हणाल्या .

यावेळी जिल्हा पंचायतीच्या माजी सदस्या सरस्वती पाटील , माधुरी हेगडे, प्रेमा मोरे , माजी आ . मनोहर किणेकर , शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी , ऍड . एम जी पाटील , आणि इतर आणि इतर मान्यवरांसहित समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Tags: