Belagavi

भाजपचे राज्य प्रवक्ते एम.बी. जिरली यांची काँग्रेसवर सडकून टीका

Share

भाजपचे राज्य प्रवक्ते एम.बी. जिरली यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. ज्यांना नागरिकांचा विसर पडला आणि संसदेत 40 जागा मिळाल्या ते आता नागरिकांच्या लक्षात आहेत. असे एम बी जिरली म्हणाले .

बेळगावातील एका खासगी हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते . काँग्रेसवाल्यांची भाषणबाजी हास्यास्पद आहे. ज्यांना नागरिकांचा विसर पडला आणि संसदेत 40 जागा मिळाल्या ते आता नागरिकांच्या लक्षात आहेत. काँग्रेसचे ट्रिपल इंजिनचे सरकार असताना सीमाभाग पेटला होता. भाजप सरकारने महादयी योजना लागू केली आहे . आज स्वतः डीके शिवकुमार यांनी सांगत आहेत कि , 200 युनिट वीज मोफत दिली जाईल.आम्ही विचारतो, तुम्ही ऊर्जामंत्री असताना काय केले? आता तुम्ही निवडणुकीची नौटंकी करणार आहात. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे काँग्रेसवाले कोण? महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली आमचे जेष्ठही स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते तुम्ही ईडीचे ग्राहक आहात, दहशतवाद्यांसाठी बोलणारे ग्राहक आहात, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. मंगळूर कुकर स्फोटातील आरोपींच्या समर्थनार्थ तुम्ही बोलत होता. अल्पसंख्याकांना खूश करण्यासाठी तुम्ही राजकारण करत होता.

जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष सीएम इब्राहिम यांचे योगी यांच्याबद्दलचे वक्तव्य म्हणजे चार वचने येतात. टी म्हणजे
तुमची जीभ स्वच्छ करा आणि बोला
योगी आदित्यनाथ हे नाथ पंथाचे आहेत
राजकारणावर बोलू नका
काँग्रेसनेच सीमावाद निर्माण केला

त्यावेळी केंद्र, राज्य आणि केरळमध्ये काँग्रेसचे सरकार होते. डीके शिवकुमार ऊर्जामंत्री असताना कर्नाटक अंधारमय राज्य होते . मोफत वीज देण्यास भाजपचा विरोध नाही तर मोफत वीज देण्यास ते पुरेसे सक्षम आहेत असे एम बी जिरली म्हणाले.

एकंदर भाजपचे राज्य प्रवक्ते एम.बी. जिरली यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.

 

Tags: