Belagavi

बेळगाव मनपा महापौर उपमहापौर निवडणूक आता 6 फेब्रुवारीला

Share

बेळगाव महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक 6 फेब्रुवारी 2023 ही निश्चित झाल्याचे प्रादेशिक आयुक्त डॉ . महांतेश हिरेमठ यांनी कळवले आहे .

बेळगाव महानगर पालिकेची निवडणूक झाल्यास जवळपास सव्वा वर्ष उलटले आहे . मात्र महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा मुहूर्त काही लागत नव्हता . यासंदर्भात आमदारांनी देखील दोन वेळा निवडणूक होणार असल्याचे सांगितले होते . नुकतेच 31 जानेवारीला ही निवडणूक होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते . मात्र आता ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून , ती आता 6 फेब्रुवारीला निश्चित करण्यात आल्याचे प्रादेशिक आयुक्त डॉ . महांतेश हिरेमठ यांनी कळवले आहे .

महापौर पदासाठी सामान्य महिला तसेच उपमहापौर पदासाठी ओबीसी महिला असे आरक्षण यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे . यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक आयुक्तांनी सांगितले आहे .

अखेर महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीची प्रतीक्षा संपली असून 6 फेब्रुवारीला बेळगाव महानगर पालिकेचे महापौर आणि उपमहापौर निश्चित होणार आहेत .

Tags: