Dharwad

मोदींच्या कार्यक्रमासाठी धारवाडहुन हुबळीला खास रेल्वे

Share

राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज दुपारी हुबळी येथे आगमन होत आहे. या कार्यक्रमाला युवकांना उपस्थित राहता यावे यासाठी धारवाडहुन हुबळीला खास रेल्वे सोडण्यात आल्या आहेत.

हुबळीत आज दुपारी साधारण चार वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उदघाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जाण्यासाठी धारवाड रेल्वे स्थानकावर युवकांची पचंड गर्दी जमली आहे. संत आणि वारकऱ्यांच्या वेशात सजलेल्या युवक-युवतींनी रेल्वेस्थानकावर गर्दी केली आहे. मोदीजी, मोदीजी अशा जोरदार घोषणा देत युवक-युवतींचा उत्साह ओसंडून वहात आहे. देशभरातील विविध प्रांतातून युवक-युवती युवा महोत्सवात भाग घेण्यासाठी जमले आहेत. सुमारे सात हजार युवक-युवतींना रेल्वेने हुबळीला नेण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे खात्याने ३ विशेष रेल्वे सोडल्या

Tags: