चिक्कोडी शहरातील एमके कवटगी मठ चॅरिटेबल ट्रस्ट आणि इतर संस्थांच्या सहकार्याने 16 तारखेला वीरराणी कित्तूर चेन्नम्मा पुतळ्याचे अनावरण करण्यास आपला कोणताही आक्षेप नाही असे विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत बोलताना विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी, चिक्कोडी शहरातील चेन्नम्मा पुतळ्याच्या उभारणीत अडथळा आणत असल्याच्या महांतेश कवटगीमठ यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. कवटगीमठ यांना चेन्नम्मा पुतळा उभारण्यास मी कोणताही आक्षेप व्यक्त केलेला नाही, असे सांगितले. चॅरिटेबल ट्रस्ट आणि असोसिएशन द्वारे पुतळा उभारण्यात येत आहे. त्यासाठी आमची संमती घेण्याची गरजच नाही.
पुतळा प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्यास मी स्वत: आणि आमदार गणेश हुक्केरी आम्ही आनंदाने सहभागी होऊ, असे त्यांनी सांगितले. चन्नमा पुतळा उभारणीला माझी कसलीही तक्रार नाही. नगरविकासाच्या निविदा प्रक्रियेबाबत मी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली. मात्र पुतळा बसवण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. चिक्कोडीमध्ये पुतळा स्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्या ठिकाणचे साधक बाधक तपासून स्वत:च निर्णय घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी नगरपरिषद सदस्य रामा माने, श्याम रेवडे, साबिर जमादार, गुलाब बागवान, रवी हंपनावर, पी. आय. कोरे, रवी मिरजे, रवी माळी, फिरोज, कलावंत बाबू समथशेट्टी आदी यावेळी उपस्थित होते.


Recent Comments