Belagavi

बेळगाव महापौर, उपमहापौर निवडीची आज अधिसूचना निघणार?

Share

मोठी उत्सुकता निर्माण झालेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीची अधिसूचना आज गुरुवार जारी केली जाण्याची शक्यता आहे.

बेळगावचे प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यासंदर्भात अधिकृत नोटीस जारी करणार आहेत. त्यानुसार 31 जानेवारी रोजी महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या 9 तारखेला नगरविकास विभागाच्या अपर सचिवांनी 21 व्या सभागृहासाठी निवडणूक घेण्याचे पत्र पाठवले आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक आयुक्त नोटीस बजावून प्रक्रिया सुरू करणार आहेत. बेळगाव महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी तर उपमहापौरपद मागासवर्गीय महिलेसाठी राखीव आहे.

Tags:

mayor-election-on-jan-31-to-be-held/ 3