Belagavi

३१ जानेवारीच्या आत होणार दोन्ही बेळगावच्या महापौर व उपमहापौरांची निवडणूक

Share

बेळगाव महानगर पालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक येत्या ३१ जानेवारी अखेर होईल अशी माहिती बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली.

बेळगाव महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीसंदर्भात बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील आणि उत्तरेस आ. अनिल बेनके यांनी आज प्रादेशिक आयुक्त महांतेश हिरेमठ यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी उभय लोकप्रतिनिधींनी महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी प्रादेशिक आयुक्त महांतेश हिरेमठ यांनी येत्या ३१ तारखेच्या आत ही निवडणूक घेण्याचे संकेत दिले.

दरम्यान, या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. अभय पाटील म्हणाले, बेळगाव महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीसंदर्भात आज मी आ. अनिल बेनके यांच्यासमवेत प्रादेशिक आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली आहे. या महिन्याच्या अखेरीस, म्हणजे साधारण ३१ जानेवारीच्या आतच निवडणूक घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे बेळगावला प्रथमच या महिनाअखेरीस राष्ट्रीय पक्षाचा महापौर व उपमहापौर मिळेल असे त्यांनी सांगितले.

एकंदर, मनपा निवडणुकीच्या साधारण सव्वा वर्षानंतर अखेर बेळगावच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीचा मुहूर्त लाभलाय असेच यावरून म्हणावे लागेल.

Tags: