बेळगावातील स्वामी विवेकानंद चौक रिक्षा स्टॅन्ड, गोंधळी गल्ली येथे बबन भोबे मित्रमंडळातर्फे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी भाजप महानगर सरचिटणीस मुरगेंद्रगौडा पाटील आणि नगरसेवक शंकर पाटील यांच्याहस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी बबन भोबे मित्रमंडळाचे अध्यक्ष बबन भोबे, विठ्ठल हुंदरे, विकास मोरे, भीमसिंग कोटी, विनायक पुजारी, कृष्णा पाटील, देवदत्त मोरे, जोतिबा अष्टेकर, राजू मोरे, राजू चौगुले, दयानंद कोलकार, महेश किल्लेकर, नागप्पा तोरनगट्टी, संजू धमुने आदी रिक्षाचालक, गोंधळी गल्लीतील नागरिक उपस्थित होते.


Recent Comments