Belagavi

संक्रांती सणानिमित्त गौरी महिला मंडळातर्फे , विविध खाद्यपदार्थ तसेच अन्य स्टॉल्स लावण्यात आले आहेत .

Share

बेळगावमधील सदाशिव नगरातील , शिवालयाच्या प्रांगणात , गौरी महिला मंडळातर्फे हे संक्रांतीनिमित्त हे स्टॉल्स लावण्यात आले आहेत . महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे स्टॉल्स लावण्यात आले आहेत .

खा . मंगला अंगडी यांनी या प्रदर्शनाचे उदघाटन केले . यानंतर त्यांनी प्रत्येक स्टॉल्सची पाहणी करून माहिती घेतली . यावेळी त्यांनी गौरी महिला मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले .

यावेळी शिल्पा वागराळी यांनी सांगितले कि दरवर्षी संक्रांती सणानिमित्त आमच्या महिला मंडळाकडून हे प्रदर्शन आणि विक्री केली जाते . मात्र कोरोनानंतर प्रथमच पुन्हा हे स्टॉल्स लावण्यात आले आहेत . खाद्यपदार्थ , कपडे, ज्वेलरी , शोभिवंत वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत . सर्वानी या प्रदर्शनाला भेट देऊन महिलांना आर्थिक दृष्ट्या सबळ करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन केले .

यावेळी मंडळाच्या अध्यक्षा जयश्री कराडकर , उपाध्यक्ष प्रेमा यत्तीनमनी , सेक्रेटरी सुजाता गोकाक तसेच सदस्य आणि स्टॉलधारक महिला उपस्थित होत्या .

Tags: