Belagavi

युनायटेड गोवन रिक्रिएशन असोसिएशनच्या वतीने आंतर हायस्कूल बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

Share

युनायटेड गोवन रिक्रिएशन असोसिएशन ही खेळांना प्रोत्साहन देणारी संस्था असून शालेय विद्यार्थ्यांसाठी आंतर हायस्कूल बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केल्याचे , इग्नेशियस मस्करन्हस यांनी सांगितले .

युनायटेड गोवन रिक्रिएशन असोसिएशन कॅम्प बेळगावच्या वतीने, संस्थेच्या आवारात , बेळगाव शहरातील मुला-मुलींसाठी आंतर हायस्कूल बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . संस्थेचे सेक्रेटरी इग्नेशियस मस्करन्हस यांनी या स्पर्धेबद्दल माहिती देताना सांगितले कि ,आमची संस्था प्रामुख्याने खेळांना महत्व देत असल्याने , आम्ही यावर्षी आंतर हायस्कुल बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली आहे . बुद्धिबळ स्पर्धेत बेळगावातील विविध 20 शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेचमाहेश्वरी अंध मुलांच्या शाळेतील 4 अंध विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे . विजेत्या आणि सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे आणि प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत .

 


स्पर्धेचे उद्घाटन विल्यम मिनेझिस, जॉर्ज रॉड्रिग्ज, प्रशांत हिरेमठ आणि सुनील कल्याणपूर तसेच बेळगाव कॅम्प पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रभाकर आलमेटी यांनी केले .

यानंतर विद्यार्थ्यांच्या बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या .

 

Tags: