Chikkodi

रायण्णा उत्सव ज्योतीरथाचे निपाणीत तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी केले स्वागत

Share

12 व 13 जानेवारी रोजी होणाऱ्या रायण्णा उत्सवाचा एक भाग म्हणून , बेळगाव जिल्हा प्रशासन व कन्नड व संस्कृती विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या रायण्णा ज्योती रथाचे निप्पाणी मध्ये आगमन झाले . तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी ज्योतीचे स्वागत करून पूजा केली.

विविध शाळांमधील विद्यार्थी व अंगणवाडी सेविकांनी जलकुंभ घेऊन , शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढून लोकांमध्ये रायन्ना उत्सवाबद्दल जागृती करण्यात आली .
नगर परिषदेचे अध्यक्ष जयवंत बाटले , उपाध्यक्षा नीता बगाडे, राजू गुंदेशा, सरकारी कर्मचारी संघाचे तालुकाध्यक्ष महादेव गोकरा, जनावडे सर , महादेव बारगळे. बीईओ रेवती मठद सर्व अधिकारी तसेच तालुकास्तरीय ग्राम सहाय्यक, नगरसेवक व नागरिक उपस्थित होते .

Tags: