Hukkeri

शासनाच्या निर्देशानुसार महापुरुषांच्या जयंती : किरण बेळवी

Share

शासनाच्या निर्देशानुसार जानेवारी महिन्यात श्री सिद्धरामेश्वर जयंती, श्री वेमन जयंती आणि श्री अंबिगर चौडय्या जयंती हुक्केरी तालुका प्रशासनातर्फे साजरी करण्यात येणार आहे अशी माहिती हुक्केरीचे ग्रेड 2 तहसीलदार किरण बेळवी यांनी दिली.

हुक्केरी तालुका प्रशासनातर्फे महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्यासंदर्भात मिनी विधानसौधमध्ये आज पूर्वतयारीची बैठक झाली. या बैठकीत बोलताना बेळवी म्हणाले की, 15 जानेवारीला सिद्धरामेश्वर जयंती, 19 जानेवारीला वेमन जयंती आणि 21 तारखेला अंबिगर चौडय्या जयंती साजरी होत असल्याने त्या-त्या समाजातील सदस्यांनी जयंती कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ग्रेड 2 तहसीलदार एन. आर. पाटील, कृषी विभागाचे सहाय्यक संचालक महादेव पटगुंदी, कोषागार विभागाचे अधिकारी बी. के. पाटील, मागासवर्गीय विभागाचे अधिकारी एम. डी. पाटील, नगरपंचायत मुख्याधिकारी मोहन जाधव, बसवराज नांदूडकर, सीडीपीओ मंजुनाथ परसण्णावर, सामाजिक कार्यकर्ते राजू कुरंदवाडे, नंजुडप्पा आदी उपस्थित होते.

Tags: