भाजप बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने आज बुधवारी लक्ष्मी नगर हिंडलगा येथे बूथ विजय अभियान राबविण्यात आले.

बूथ विजय अभियानांतर्गत लक्ष्मी नगर, हिंडलगा येथे घरोघरी भाजपचे पक्षध्वज लावण्यात आले. यावेळी राज्य आणि केंद्रातील भाजपच्या लोक कल्याणकारी योजना, कार्यक्रमांची जनतेला माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला भाजप बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, जिल्हा संघटना सह सरचिटणीस जयप्रकाशजी, हिंडलगा ग्राम पंचायत सदस्य स्नेहल कोलकार, जिल्हा खजिनदार मल्लिकार्जुन माद्दन्नावर, जिल्हा ग्रामीण सरचिटणीस संदीप देशपांडे, ग्रामीण मंडळ विस्तारक मंथन गायकवाड, विलास ताशीलदार, अजित हलकर्णी तसेच इतर भाजप कार्यकर्ते व हिंडलगा ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments