संक्रांती सणानिमित्त गौरी महिला मंडळातर्फे , विविध खाद्यपदार्थ तसेच अन्य स्टॉल्स लावण्यात आले आहेत .
बेळगावमधील सदाशिव नगरातील , शिवालयाच्या प्रांगणात , गौरी महिला मंडळातर्फे हे संक्रांतीनिमित्त हे स्टॉल्स लावण्यात आले आहेत . महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे स्टॉल्स लावण्यात आले आहेत .
खा . मंगला अंगडी यांनी या प्रदर्शनाचे उदघाटन केले . यानंतर त्यांनी प्रत्येक स्टॉल्सची पाहणी करून माहिती घेतली .
यावेळी शिल्पा वागराळी यांनी सांगितले कि दरवर्षी संक्रांती सणानिमित्त आमच्या महिला मंडळाकडून हे प्रदर्शन आणि विक्री केली जाते . मात्र कोरोनानंतर प्रथमच पुन्हा हे स्टॉल्स लावण्यात आले आहेत . खाद्यपदार्थ , कपडे, ज्वेलरी , शोभिवंत वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत .

सर्वानी या प्रदर्शनाला भेट देऊन महिलांना आर्थिक दृष्ट्या सबळ करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन केले

यावेळी मंडळाच्या अध्यक्षा , उपाध्यक्ष , तसेच सदस्य आणि स्टॉलधारक महिला उपस्थित होत्या .


Recent Comments