खेळत असताना दोन मुलांचा पाण्यात पडून बुडून मृत्य झाल्याची घटना मंगळवारी दुपारी सौंदत्ती तालुक्यातील गर्ल होसूर येथे घडली आहे .

सौंदत्ती तालुक्यातील गर्लहोसूर येथे , वाल्मिकी भवन इमारतीचे बांधकाम सुरु आहे . या ठिकाणी पाणी साठवण्यासाठी टाकी बांधण्यात आली असून या टाकीजवळ खेळणाऱ्या दोन मुलांचा टाकीत पडून बुडून मृत्यू झाला .
श्लोक शंभूलिंगप्पा गुडी (वय ४ )आणि चिदानंद प्रकाश साळूंखे (वय ४)अशी या दुर्दैवी मुलांची नावे आहेत . प्रगती पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक खाजगी नर्सरीमध्ये ही मुले शिकत होती .
या घटनेची माहिती मिळताच सौंदत्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शोधमोहीम राबवली . ह्या चिमुरड्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .


Recent Comments