भटक्या कुत्र्यांनी एका भिक्षुक महिलेवर हल्ला चढवून ठार केल्याची घटना धारवाड तालुक्यातील उप्पिनबेटगेरी गावात घडली.
उप्पिनबेटगेरी येथील कब्रस्तानजवळ ही दुर्दैवी घटना घडली. काल रात्री ही भिक्षुक महिला कब्रस्तानजवळ झोपली असताना सुमारे 15-20 भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर अचानक हल्ला केला. तसेच तिला ओढत नेले आणि तिच्या मांड्या व हाताला चावा घेतला. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव व पत्ता समजलेला नाही.
ही घटना पाहून स्थानिकांनी गरग स्टेशनच्या पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भिकाऱ्यांवर हल्ला करून मारणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.


Recent Comments