Belagavi

हिंडाल्को विरोधात यमनापूर ग्रामस्थांचा भव्य मोर्चा

Share

बेळगाव तालुक्यातील यमनापूर गावच्या ग्रामस्थांनी हिंडाल्को कंपनीच्या विरोधात निषेध मोर्चा काढला . यावेळी आपल्या विविध मागण्यांचे फलक घेऊन , हिंडाल्को कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी केली .


यमनापूर गावातील ग्रामस्थांची जमीन , हिंडाल्को कंपनीने आपल्या व्यवसायासाठी घेतली आहे . मात्र कंपनीकडून , गावातील लोकांना कोणतीही सुविधा देण्यात येत नसल्याही गावकर्यांह आरोप आहे .

 

यमनापूर गावातील लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आलेले नाही . शिवाय गावातील तरुणांना नोकरीत सामावून घेत नाहीत . हिंडाल्को कंपनीतून बाहेर पडणारे दूषित पाणी ,जमिनीत मुरून, गावातील लोकांच्या विहिरीच्या पाण्यात मिसळत असल्याने , विहिरीचे पाणी दूषित झाले आहे . कंपनीकडून गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील करण्यात येत नाही . ऍसिडच्या पावडरमुळे गावात प्रदूषण पसरले आहे .


या सर्वाला विरोध दर्शवून , आज सोमवारी , यमनापूर गावातील ग्रामस्थांनी , महिलांसहित , हिंडाल्को कंपनीवर निषेध मोर्चा काढला .

यावेळी गावातील प्रमुखांनी आपली मराठीला हिंडाल्को कंपनीमुळे गावात उद्भवणाऱ्या समस्यांची माहिती दिली .

हिंडाल्को कंपनीच्या प्रशासन अधिकाऱ्यांना या आधी अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत . मात्र दरवेळी या अधिकाऱ्यांकडून उद्धट उत्तरे देऊन ,ग्रामस्थांची बोळवण केली जाते असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे . (

यमनापूर गावातील ग्रामस्थांच्या समस्यांना हिंडाल्को कंपनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या सोडवेल अशी आशा आहे

Tags: