हुबळी येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उदघाटन समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १२ जानेवारी रोजी हुबळीत येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.
बेंगळूर येथे आज, सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, हुबळीत आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उदघाटन पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते १२ जानेवारीला होणार आहे. दिल्लीहून ते थेट हुबळी येथे येतील. महोत्सवाचे उदघाटन करून लगेचच ते परत जाणार आहेत. त्यानंतर १९ जानेवारीलाही मोदी राज्याच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.
पण हा दौरा अद्याप निश्चित झालेला नाही. नारायणपूर येथे केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीतून देशातील महत्वाकांक्षी एनएलव्हीसी ऍटोमोशन प्रकल्पाचे उदघाटन यांच्याहस्ते व्हायचे आहे. त्याशिवाय कलबुर्गी येथे बंजारा समाजाचा भव्य मेळावा घेण्याचा विचार सुरु आहे. हे दोन्ही कार्यक्रम १९ जानेवारीला घायचा विचार आहे. मात्र त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. दौरा निश्चित झाल्यास मोदींच्या उपस्थितीत हे कार्यक्रम पार पडतील असे मुख्यमंत्र्यानी सांगितले.
एकंदर १२ जानेवारीला मोदी हुबळीत येणार असल्याचे निश्चित आहे असेच म्हणावे लागेल.


Recent Comments